Shevati ekatach

Shevati ekatach

Saturday, January 8, 2011

Ajun Mala Barach Kahi Pahayachay.................


अजून मला बरंच काही पहायचंय
या दुनियेकडुन, खूप काही शिकायचयं,
इथे, मलाही काहीतरी बनायचयं
म्हणून मला अजून, भरपूर जगायचं ....

सुखाच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुलायचं
प्रेमाच्या वर्षावाने, न्हाऊन निघायचं,
काळजी, द्वेष, सारं फेकुन द्यायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं अस्तित्व या दुनियेत पहायचं,
आपलं महत्वं कुठे आहे का, हे सतत शोधायचं,
आपल्या प्रियजनांना नेहमीच जपायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं.

आपलं सारं कही, क्षणात दुसर्‍याला द्यायचं
एकदा दिल्यावर मात्र परत नाही मागायचं,
गोड आठवणींना, मनात आपल्या साठवायचं
आणि, अचानक कधीतरी, क्षणात निघुन जायचं..


No comments:

Post a Comment