Shevati ekatach

Shevati ekatach

Saturday, January 15, 2011

Kadhi KAdhi................................

कधी कधी आठवणींसोबत

जगायच असत...

छोट्या छोट्या गोष्टिंत

मन रमायच असत...नाहीच जमल काहि तर

रुसायच असत स्वत:वरच...

आणि मग् स्वत:लाच

मनवायच असत...

मनाच्या सोबत लांब लांब

जायच असत...गुपचुप

पक्षि का गातात?

पाऊस का पडतो?

तुझ-माझ का जमत ?

(असे प्रश्न नसतात ग् विचारायचे..)

अळवाच्या पाऊसाला

त्याच् आणि धरतीच

नात नसत ग विचारायच...

आयुष्य मनसोक्त जगायच असत

जस कोसळनाऱ्या पाऊसासारख...

किंवा खळाळणाऱ्या झऱ्यासारख

आईसक्रिम वितळण्याआधी

संपवायच असत ग...

आयुष्य असच जगायच असत् ग्!!!!

No comments:

Post a Comment