बघ ना
सर्वांना सुचते, येते जाते,
रूसते फुगते, हसते, रडते
माझ्याशीच का ग असली कट्टी ?
सांग ना कुणाशी जमवली तू बट्टी ?
येशील तर ये
मी नाही म्हणणार
ये ये ये ..
जाशील तर जा
मी नाही म्हणणार
जा जा जा
तू बाई असली, खट्याळ कसली
तुला खूश ठेवले, तू..
माझ्यावरच रूसली
रूस बाई रूस
कर धूसफूस
जाशील रूसून
बघशील फुगून
मी ही म्हणेन कविते
तुला ग हसून
जा पोरी जा
तू येशील फिरून
तुझे सारे शब्द मी
ठेवलेत जपून
,
,
तू येशील फिरून
No comments:
Post a Comment