Shevati ekatach

Shevati ekatach

Friday, February 25, 2011

Tu parat yeu nakos

तु परत येऊ नकोस, जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत, मनावरील जखमा भरायला.....

दुःख अंतरी दाबुन, एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक, सर्वांसोबत हसत असतो.....

तु आयुष्यात परत येऊ नकोस, तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय, त्या सर्व आठवणी विसरायला.....

पण... काहीही असले तरी........
तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......

तुला विसरण्याचा, आत्ता कुठे मी
प्रयत्न
करतोय, पण ही कवीता लिहीता लिहीता,
तुलाच गं मी आठवतोय...

एवढे एक करशील ना ........................

एवढे एक करशील ना ........................

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

आयुष्य

आयुष्य

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

Aayushya................

आयुष्याच्या
अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात .
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज

मात्र शिल्लक नसतात .

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर

चहाचा घोट घेत
टॉम अँड जेरी पाहिल पाहिजे .

आंघोळ फ़क्त दहा
मिनीटे?
एखाद्या
दिवशी तास द्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता
आल पाहिजे .

भसाडा
का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे ,
वेडेवाकडे
अंग हलवत
नाचणंसुद्धा
जमलं पाहिजे.

गीतेचा रस्ता योग्यच आहे .
पण
एखादा दिवस
पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच"
सुद्धा
एन्जॉय करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या

काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेतसुद्धा

फ़िरलं पाहिजे .
'फ़ुलपाखरांच्या' सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

द्यायला

कोणी नसलं
म्हणुन काय झालं ?
एक गजरा विकत घ्या
ओंजळभरुन फुलांचा

नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला
द्या,
एवढ्या
सुंदर जगण्यासाठी
नुसतं थॅंक्स तरी म्हणा!

प्रेमात पडल की ..............

प्रेमात पडल की ..............

प्रेमात पडल की असच काहीस होत असत ....
वेगळ्याच दुनीयेत मन जगत असत ....

उंच — उंच पक्ष्या सारख उड़त असत,
खोल — खोल समुद्रात पोहत असत .....
इकडून — तीकडे नी तीकडून हीकडे,
मन सतत फीरत असत .....

प्रेमात असतो रुसवा — फुगवा,
प्रेमात असतो प्रेमळ गारवा ....
प्रेमाच्या हीन्दोल्यावर मन उसळी घेत असत,
प्रेमळ आठवणीत मन सतत रमत असत ....

डोळ्यातल्या आसवांना वीसरुण हसाव लागत,
गुलाब — मोगर्या प्रमाणे फुलाव लागत ....
मनात कीतीही दुःख तरी,
ओठांवर हसू घेउन वाव्राव लागत ....

प्रेमात नसते जाती — धर्म,
प्रेमात नसतो गरीब नी श्रीमंत .....
प्रेम म्हणजे प्रेम असत,
मनाच मनाशी जुलालेल एक नात असत .....

माझ्यासाठी तू नी तुझ्यासाठी मी,
असाच काहीस बोलत असत ...
प्रेम असत मनात,
पण डोळ्यातून ते कळत असत .....

प्रेम................

प्रेम................

प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो
प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


पान-टपरी वाल्याकडे त्याची अगदी महिनो-महीने उधारी असते
तरी तिच्यासाठी चन्द्र आणण्याची त्याची एक पायावर तयारी असते
तिच्यासथि काहिही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोल्वर दड्लेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........

तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो

कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो......

Hajarat ek asavi

हजारात एकच असावी अशी
ऒरकुट्वर सेल नंबर न सोडणारी
उन्हाळा पावसाळा काहीही असो
स्क्रपचा काऊंटर हलता ठेवणारी

भेटली नाही कधीही तरीही
भेटावस तिला असे वाटणारी
रोजच भेटतात कित्येकजण तरीही
स्व:तचा वेगळा ठसा उमटवणारी

बिनधास्त बेधडक चंचल धाडसी
कोल्हापुरी मिरचीसारखी झटका देणारी
अन झाडावरच पानही गळताना
कधी कधी तन्मयतेने पाहणारी

चार चौघीत मिसळुन जातानाही
स्वत:च वेगळ आस्तित्व बाळगणारी
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणा क्षणाचा
स्वत:च्या शैलीत आनंद लुटणारी

ऎकत रहाव नेहमी अशी
सुखद बडबड बडबड करणारी
विचार करत रहाव अस
जीवनाच शहाणपण कधी सांगणारी

अशीच असावी एकादी मैत्रीण
सर्वापासुन थोडीशी वेगळी भासणारी
आधुनिक जगात आधुनिक होताना
स्व:तच साधेपण हळुवार जपणारी