तुझ्याच डोळ्यात पाहिलेला नि दोघांच्या मनांत वसवलेला स्वप्नांचा गाव मागतोय तुला. ऊगवतीचा सूर्य नाही, पण सांजेचा दिवा मालवून एकाकीपणांत तुझ्या स्वप्नांत रमवणारी निशा मागतोय तुला. परत तुझी साथ नाही पण, तू हात सोडल्यापासून माझी जगण्याची हरवलेली दिशा मागतोय ... विस्तृत तुझ्याच डोळ्यात पाहिलेला नि दोघांच्या मनांत वसवलेला स्वप्नांचा गाव मागतोय तुला. ऊगवतीचा सूर्य नाही, पण सांजेचा दिवा मालवून एकाकीपणांत तुझ्या स्वप्नांत रमवणारी निशा मागतोय तुला. परत तुझी साथ नाही पण, तू हात सोडल्यापासून माझी जगण्याची हरवलेली दिशा मागतोय तुला. तुझ्या काळजावरचा हक्क तर गमावला पण..... तुझ्या नजरेच्या एकाचं कटाक्षानं चुकलेला, माझ्या काळजाचा ठोका मागतोय तुला प्रितीचा वृक्ष उन्मळून पडण्याआधी, त्याला बांधून उंच अंबरी गेलेला स्वप्नांचा झोका मागतोय तुला. तुझ्या काळजाचा कोपरा नको, पण त्याच कोपऱ्यांत अडकलेला माझांच शेवटचा श्वास मागतोय तुला. तुला जाताना रोखणार नाही, पण तुझ्यासोबत निघून चाललेला माझा जगण्याचा ध्यास मागतोय तुला.... माझाच जगण्याचा ध्यास मागतोय तुला.
No comments:
Post a Comment