Shevati ekatach

Shevati ekatach

Friday, February 25, 2011

Hajarat ek asavi

हजारात एकच असावी अशी
ऒरकुट्वर सेल नंबर न सोडणारी
उन्हाळा पावसाळा काहीही असो
स्क्रपचा काऊंटर हलता ठेवणारी

भेटली नाही कधीही तरीही
भेटावस तिला असे वाटणारी
रोजच भेटतात कित्येकजण तरीही
स्व:तचा वेगळा ठसा उमटवणारी

बिनधास्त बेधडक चंचल धाडसी
कोल्हापुरी मिरचीसारखी झटका देणारी
अन झाडावरच पानही गळताना
कधी कधी तन्मयतेने पाहणारी

चार चौघीत मिसळुन जातानाही
स्वत:च वेगळ आस्तित्व बाळगणारी
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणा क्षणाचा
स्वत:च्या शैलीत आनंद लुटणारी

ऎकत रहाव नेहमी अशी
सुखद बडबड बडबड करणारी
विचार करत रहाव अस
जीवनाच शहाणपण कधी सांगणारी

अशीच असावी एकादी मैत्रीण
सर्वापासुन थोडीशी वेगळी भासणारी
आधुनिक जगात आधुनिक होताना
स्व:तच साधेपण हळुवार जपणारी

No comments:

Post a Comment