Shevati ekatach

Shevati ekatach

Friday, February 25, 2011

बहुतेक..

बहुतेक..

तू कधी चीडवलस की,
मी उगाच रुसून बसायची..
तू येतोस का मनवायला ,
याची वाट पाहायची..
.
.
बहुतेक अर्थ खोट्या रुसन्याचा,
तुला कळलाच नसावा........

पण जेव्हा तू रागवायचास,
खूप वाईट वाटायचं.
तुझ्या मिठीत येऊन,
खूप रडावसं वाटायचं..
.
.
बहुतेक अर्थ भिजल्या पापण्यांचा,
तुला कळलाच नसावा........

कधी एखाद्या सायंकाळी मी,
तुझ्या डोळ्यात पाहत राहायची..
हरवलेलं ते प्रेम शोधात असायची,
तू मात्र काही न कळल्यागत वागायचास..
.
.
बहुतेक अर्थ मुक्या शब्दांचा
तुला कळलाच नसावा........

तू दूर होत गेलास..खूप दूर..
आणि निघून गेलास अगदी कायमचा..
मी खूप एकटी पडलेली रे ,
तुला एकदाही परत यावंसं वाटलं नाही??
.
.
बहुतेक फरक माझ्या नसण्याचा,
तुला पडलाच नसावा........
.
.
आता सावरलंय स्वताला
आजही तितकंच प्रेम करते तुझ्यावर,
तुझ्या-माझ्या गोड आठवणींवर ..

तू सोबत नाहीस, म्हणून काय झालं?
तू खुश आहेस,यातच सारं काही मिळालं..
.
.
बहुतेक अर्थ खऱ्या प्रेमाचा,
तुला कळलाच नसावा
कळलाच नसावा...

No comments:

Post a Comment