Shevati ekatach

Shevati ekatach

Thursday, February 24, 2011

Manat tuuuuuu............

मनात तू,
हृदयात तू.
डोळ्यात माझ्या तूच तू
विचारात देखिल तूच!

जिथे जातो मी तिथे तू,
एखाद्या सावली सारखी माझ्या संगे असतेस तू!
पावलो पावली आठवतेस तू,
गल्ली बोळात देखिल दिसतेस तूच!

पहाटेच्या गारव्यात तू,
दुपारच्या कडक उन्हात देखिल तूच!
दिवसा स्वप्ने पाहतो मी त्यात देखिल तू,
रात्री झोप येत नाही ह्याचे कारण पण तूच!

डोंगर कपारीत फिरताना जाणवतेस तू,
राना वनात भासतेस तूच!
थकून थांबल्यावर पुढे जायला प्रोत्साहन देतेस तूच,
घामाच्या धारा पुसण्यासाठी बनलेला रुमाल देखिल तूच!

माझ्या रोमा रोमात तू
नसा नसात भिनलीस तूच!
श्वासात तू,
उसासे टाकतो मी, त्यात देखिल तू,
माझं सळसळणारं रक्त बनून धावतेस देखिल तूच!

माझ्या हळव्या मनाला छळणारी तू,
मनाला कधी सुखावणारी तू,
वाट पहायला लावून मन बेचैन करणारी तू,
त्याच मनाला कधी उभारी देणारी देखिल तूच!

अशी फ़क्त जाणवणारी ती तू,
कधीही न भेटणारी ती तू,
दूर राहुनाही सगळ्यात जवळ तू
जवळ असून ही सगळ्यात दूर तूच!

No comments:

Post a Comment