Shevati ekatach

Shevati ekatach

Friday, February 25, 2011

Tu parat yeu nakos

तु परत येऊ नकोस, जुन्या आठवणी जागवायला,
आधीच खुप दिवस लागलेत, मनावरील जखमा भरायला.....

दुःख अंतरी दाबुन, एकांतामध्ये रडत असतो,
म्हणुनच का कोणास ठावुक, सर्वांसोबत हसत असतो.....

तु आयुष्यात परत येऊ नकोस, तुझे स्थान मिळवायला,
आधीच फार वेळ लागलाय, त्या सर्व आठवणी विसरायला.....

पण... काहीही असले तरी........
तुला शोधायला तरी,
नजर माझी फिरत असते,
आकाशीचा चंद्र पाहील्यावर,
तुझीच आठवण दाटुन येते......

तुला विसरण्याचा, आत्ता कुठे मी
प्रयत्न
करतोय, पण ही कवीता लिहीता लिहीता,
तुलाच गं मी आठवतोय...

एवढे एक करशील ना ........................

एवढे एक करशील ना ........................

शब्दांत नाही सांगता येणार
डोळ्यांतुन समजुन घेशील ना ?

अस्वस्थ होइन मी जेव्हा
धीर मला देशील ना ?

माझ्याही नकळत दुखावले तुला तर
माफ़ मला करशील ना ?

ओघळले अश्रु माझे तर
अलगद टिपून घेशील ना ?

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?

सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?

चुकतोय मी असे वाटले कधी तर
हक्काने मला सांगशील ना ?

हरवलो मी कुठे कधी जर
सावरून मला घेशील ना ?

कितीही भांडलो आपण तरीही
समोर आल्यावर सारे विसरून जाशील ना ?

मी आता विसरणे शक्य नाही तुला
तू मला लक्षात ठेवशील ना ?

जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

मला तुझी गरज आहे, हे
न सांगता ओळखशील ना ?

आजवर तुझ्यासाठी काही नाही करू शकलो,
पण माझ्यासाठी एवढे एक करशील ना ?

तुझ्यासाठी मी कित्येकांपैकी एक असलो
तरी माझ्यासाठी..........
तूच एक असशील ना ?

आयुष्य

आयुष्य

आयुष्य म्हणजे कटकट..
जगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं
सुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं
आयुष्य म्हणजे वणवा....
इथे वेदनांना घेउन जळावं लागत
पोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं

आयुष्य म्हणजे अंधार...
इथे काळोखात बुडाव लागतं
परस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं

आयुष्य म्हणजे पाऊस....
आप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं
कष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं

पण ...आयुष्य हे असेच का ?
मला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य
जिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.
आपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.

Aayushya................

आयुष्याच्या
अल्बममध्ये
आठवणींचे फ़ोटो असतात .
आणखी एक कॉपी काढायला
निगेटिव्ह्ज

मात्र शिल्लक नसतात .

गजर तर रोजचाच
आळसाने झोपले पाहिजे,
गोडसर

चहाचा घोट घेत
टॉम अँड जेरी पाहिल पाहिजे .

आंघोळ फ़क्त दहा
मिनीटे?
एखाद्या
दिवशी तास द्या,
आरशासमोर स्वतःला
सुंदर म्हणता
आल पाहिजे .

भसाडा
का असेना
आपल्याच सुरात रमलं पाहिजे ,
वेडेवाकडे
अंग हलवत
नाचणंसुद्धा
जमलं पाहिजे.

गीतेचा रस्ता योग्यच आहे .
पण
एखादा दिवस
पाडगावकराना द्या,
रामायण मालिका नैतिक थोर
"बेवॉच"
सुद्धा
एन्जॉय करता आली पाहिजे.

कधीतरी एकटे
उगाचच फ़िरले पाहिजे,
तलावाच्या

काठावर
उताणे पडले पाहिजे.

संध्याकाळी मंदिराबरोबरच
बागेतसुद्धा

फ़िरलं पाहिजे .
'फ़ुलपाखरांच्या' सौंदर्याला
कधीतरी भुललं पाहिजे.

द्यायला

कोणी नसलं
म्हणुन काय झालं ?
एक गजरा विकत घ्या
ओंजळभरुन फुलांचा

नुसता श्वास घ्या.

रात्री झोपताना मात्र
दोन मिनीटे देवाला
द्या,
एवढ्या
सुंदर जगण्यासाठी
नुसतं थॅंक्स तरी म्हणा!

प्रेमात पडल की ..............

प्रेमात पडल की ..............

प्रेमात पडल की असच काहीस होत असत ....
वेगळ्याच दुनीयेत मन जगत असत ....

उंच — उंच पक्ष्या सारख उड़त असत,
खोल — खोल समुद्रात पोहत असत .....
इकडून — तीकडे नी तीकडून हीकडे,
मन सतत फीरत असत .....

प्रेमात असतो रुसवा — फुगवा,
प्रेमात असतो प्रेमळ गारवा ....
प्रेमाच्या हीन्दोल्यावर मन उसळी घेत असत,
प्रेमळ आठवणीत मन सतत रमत असत ....

डोळ्यातल्या आसवांना वीसरुण हसाव लागत,
गुलाब — मोगर्या प्रमाणे फुलाव लागत ....
मनात कीतीही दुःख तरी,
ओठांवर हसू घेउन वाव्राव लागत ....

प्रेमात नसते जाती — धर्म,
प्रेमात नसतो गरीब नी श्रीमंत .....
प्रेम म्हणजे प्रेम असत,
मनाच मनाशी जुलालेल एक नात असत .....

माझ्यासाठी तू नी तुझ्यासाठी मी,
असाच काहीस बोलत असत ...
प्रेम असत मनात,
पण डोळ्यातून ते कळत असत .....

प्रेम................

प्रेम................

प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो
प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो,
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


तिच्या चेहरयाला चन्द्र म्हणण्याची
त्याची सवय काही मोडलेली नसते
तिने कितीही डोळा चुकविला तरीही
त्याने जीद्द सोड्लेली नसते
तिच्या सॊन्दर्य़ाचे गुणगाण करण्याचा छन्दच जणू त्याला जड्लेला असतो
कारण,प्रत्येकजण कधी ना कधी एकदा तरी प्रेमात पडलेला असतो...


पान-टपरी वाल्याकडे त्याची अगदी महिनो-महीने उधारी असते
तरी तिच्यासाठी चन्द्र आणण्याची त्याची एक पायावर तयारी असते
तिच्यासथि काहिही करण्याचा निर्धार, त्याच्या मनात खोल्वर दड्लेला असतो
कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो........

तिच्यासाठी गुलाब तोड्ताना तो
कधी काट्यान्ची तमा बाळगत नाही
आणि ती; सोबत असेपर्यन्त त्याला,
दुखः कधीच उमगत नाही,
तिच्या क्षणभर दुराव्यानेही, तो दुखः सागरात बुडालेला असतो

कारण नक्षत्राच्या गर्दित प्रत्येकाने आप-आपला चन्द्र निवडलेला असतो......

Hajarat ek asavi

हजारात एकच असावी अशी
ऒरकुट्वर सेल नंबर न सोडणारी
उन्हाळा पावसाळा काहीही असो
स्क्रपचा काऊंटर हलता ठेवणारी

भेटली नाही कधीही तरीही
भेटावस तिला असे वाटणारी
रोजच भेटतात कित्येकजण तरीही
स्व:तचा वेगळा ठसा उमटवणारी

बिनधास्त बेधडक चंचल धाडसी
कोल्हापुरी मिरचीसारखी झटका देणारी
अन झाडावरच पानही गळताना
कधी कधी तन्मयतेने पाहणारी

चार चौघीत मिसळुन जातानाही
स्वत:च वेगळ आस्तित्व बाळगणारी
आयुष्यातल्या प्रत्येक क्षणा क्षणाचा
स्वत:च्या शैलीत आनंद लुटणारी

ऎकत रहाव नेहमी अशी
सुखद बडबड बडबड करणारी
विचार करत रहाव अस
जीवनाच शहाणपण कधी सांगणारी

अशीच असावी एकादी मैत्रीण
सर्वापासुन थोडीशी वेगळी भासणारी
आधुनिक जगात आधुनिक होताना
स्व:तच साधेपण हळुवार जपणारी

tiiiiiiiiiiii

तिने मैत्री केली .....!
ती वादळा सारखी आली
आणि डोळ्यात पाणी ठेऊन गेली
एकट्याला सोडून जाण्यासाठी का ?
तिने मैत्री केली .....!
तिचे येन मला कळले नाही
तीच जान मला कळले नाही
शुद्धीवर आलो तेव्हा कळले
माझ्याकडे काहीच उरले नाही
तिच्या साठी झुरायचं
तिच्या साठी मारायचं
का अस होतंय
शेवटी आपणच आपल उरायचं
तिच्या साठी पाहिलेले स्वप्न
तिच्यावर ठेवलेला विश्वास
ती सहज तोडून गेली
एकट्याला सोडून जाण्यासाठी का ?
तिने मैत्री केली .....!

बहुतेक..

बहुतेक..

तू कधी चीडवलस की,
मी उगाच रुसून बसायची..
तू येतोस का मनवायला ,
याची वाट पाहायची..
.
.
बहुतेक अर्थ खोट्या रुसन्याचा,
तुला कळलाच नसावा........

पण जेव्हा तू रागवायचास,
खूप वाईट वाटायचं.
तुझ्या मिठीत येऊन,
खूप रडावसं वाटायचं..
.
.
बहुतेक अर्थ भिजल्या पापण्यांचा,
तुला कळलाच नसावा........

कधी एखाद्या सायंकाळी मी,
तुझ्या डोळ्यात पाहत राहायची..
हरवलेलं ते प्रेम शोधात असायची,
तू मात्र काही न कळल्यागत वागायचास..
.
.
बहुतेक अर्थ मुक्या शब्दांचा
तुला कळलाच नसावा........

तू दूर होत गेलास..खूप दूर..
आणि निघून गेलास अगदी कायमचा..
मी खूप एकटी पडलेली रे ,
तुला एकदाही परत यावंसं वाटलं नाही??
.
.
बहुतेक फरक माझ्या नसण्याचा,
तुला पडलाच नसावा........
.
.
आता सावरलंय स्वताला
आजही तितकंच प्रेम करते तुझ्यावर,
तुझ्या-माझ्या गोड आठवणींवर ..

तू सोबत नाहीस, म्हणून काय झालं?
तू खुश आहेस,यातच सारं काही मिळालं..
.
.
बहुतेक अर्थ खऱ्या प्रेमाचा,
तुला कळलाच नसावा
कळलाच नसावा...

प्रेम

प्रेम

प्रेम
प्रेम कसे होते हे कळतच नाही
वेडावलेले मन समजून राहत नाही.

वेडावलेल्या मनाला त्याचीच आस लागून राहते
जशी चातक पक्षाला एका थेंबाची गरज असते.

प्रेमाचा आनंद लपवता येत नाही
जसे वसंत ऋतू मध्ये मोर नाचल्याविना राहत नाही.

कळतच नाही प्रेम हे कधी होवून जाते
अंधारमय जिवन मग प्रकाशमय वाटू लागते.

प्रकाशमय जिवनातील मग आकाशात चंद्रच राही
निघून जाताच जिवनातून प्रेम मग पौर्णिमेला ही अंधार होई.

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची............!

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची............!

होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची
फोनवर माझ्याशी तासंतास बोलत बसायची
माझे PJ सुध्हा ती हसत हसत ऐकायची



तिच्या मनातल सगळच मला सांगायची
सुखांमध्ये मला नेहमीच तिची साथ होती
दुःखांमध्ये मला सावरनारा हात होती
माझ्या सोबत हसायची माझ्या सोबत रडायची
अशी होती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची

एक दिवशी अचानक तिने मला भेटायला बोलवल



तिच्या आवाजात थोडस दडपण मला जाणवल
"लग्न ठरलय रे माझ" तिने भेटल्यावर सांगितल
"लग्नाला नक्की ये" अस आहेर माझ्याकडे मागितल
पायाखाली माझ्या जमीन राहिली न्हवती ते ऐकून
थोडावेळ स्तब्ध राहिलो आणि अश्रु टाकले मी पिउन



बिखरलेल्या ह्रुदयाच मात्र कमी होत न्हवत कंपन
खोट हास्य आणून चेहरयावर कसबस केल तिला अभिनंदन

ती गेल्यावर चुक माझी मला उलगडली होती
मीच मैत्रीची पायरी न कळत ओलांडली होती
प्रेम होत माझ तिच्यावर पण तिच्या मनातल माहित न्हवत



म्हणुन प्रेमासाठी मैत्रीचा बळी देन मनाला कधीच पटत न्हवत
नक्की मोठी चुक कोणती? तिच्यावर प्रेम करण की प्रेम व्यक्त न करण
हे माझ्या जीवनातल न उलगड़लेल कोड होत
माझ्या चुकीचे प्रायच्छित बहुदा फ़क्त तिच्या दूर गेल्याने झाल न्हवत



म्हणुनच बहुतेक ते कोड सोडवायला तीच मला पुन्हा एकदा भेटण ठरल होत

ती समोर आली पण सुरवात कुठून करायची तेच ती विसरली
तेव्हा आम्हा दोघांमध्ये जणू बोचरया शांततेची लाटच पसरली
एकमेकांबरोबरच्या प्रवासाचा FLASHBACK डोळ्यांसमोर आला होता



आणि अश्रूंचा उद्र्येक दोघांनीही कसाबसा रोखला होता
"सगळ सांगितल रे मनातल तुला, पण एकच गोष्ट सांगायची राहिली"
"खुप प्रेम केल रे तुझ्यावर आणि तुझ्या विचारण्याची नेहमीच वाट पहिली"
न राहवून तिने तिच्या ह्रुदयाच अस मौन तोडल



आणि न कळतच तिने माझ ह्रदय पुन्हा एकदा मोडल



-

एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची



गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती
तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे - ही आहे

Thursday, February 24, 2011

Kal ratichya pavaasat...........

काल रात्रीच्या पावसात.....
एक सर अशी येऊन गेली,
मनातल्या तुझ्या आठवणींना
चीम्ब -चीम्ब करून गेली....

थंड वाऱ्याची झुळूक
अंगाशी झोंबून गेली
त्या वाऱ्यानेही मला
तुझ्याच स्पर्शाची चाहूल दीली...

मग पावसाने आपला जोर कमी केला,
आणी मी त्याच्या सरी झेलण्याचा खेळ सुरु केला
तुझ्या हृदयस्पर्शी आठवणींच्या या पावसात,
जीव कसा बघ न्हावूनी गेला....

असं वाटलं... हा आठवणींचा पाऊस नसून, प्रेमाचा पाऊस असावा
जसा थंड वाऱ्याच्या ऐवजी तुझाच गरम स्पर्श असावा...
मग चीम्ब-चीम्ब व्हायला आठवणींची गरज नाही
आणी साथ तुझी असल्यावर मला काहीच अशक्य नाही....

College che te divas.........

कॉलेजचे ते दिवस अजूनही आठवतात. तुझी भिरभिरती नजर, इकडे-तिकडे बघण्याचा खोटा प्रयत्न आणि हळूच चोरट्या नजरेने माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसणं. तुझ्या या प्रकाराचं मला खूप कुतूहल वाटायचं. तुझा तो शांत चेहरा सतत मला शोधायचा. कॉलेजच्या दुसऱ्या मजल्यावरून हळूच खाली वाकून बघणं आणि मी पाहिल्यावर लगेच मागे होऊन दुसरीकडे बघण्याचं नाटक करणं. या सगळ्याची मला खूप मजा वाटायची. नकळत मला त्याची सवय झाली आणि माझीच नजर तुला पाहण्यासाठी भिरभिरायला लागली. एव्हाना तुलासुद्धा हे समजलं होतं! आठवतं तुला? एकदा तुझ्या मित्रांसोबत सिगरेट ओढताना पाहिलं होतं. तुझ्या मागेच होते मी. तुला बघून क्षणभर मी तिथेच थांबले. मला बघून ती सिगरेट तुझ्या मित्राला दिलीस. तुझं ते वागणं आणि माझं तिथून निघून जाणं मला खूप विचित्र वाटत होतं. नकळत मीसुद्धा तुझ्या प्रेमात पडले. माझं सारं विश्वच बदललं तुझ्यामुळे. आपलं हे अबोल प्रेम खूप दिवस चाललं. कॉलेजचं शेवटचं वर्ष उजाडलं. आपल्या प्रेमातला एक असा टप्पा, जिथे प्रेम व्यक्त केलं, तर केलं आणि नाही केलं, तर कधीच नाही! बस्स्, ठरवलं की, मी पुढाकार घेईन. आज आपल्या प्रेमाला चार वर्षं झाली. या चार वर्षांत आपण अनेक संकटांना तोंड दिलं. तू माझी सोबत कधीच सोडली नाहीस. तुझ्या प्रेमाने मला जगण्याची नवी दिशा मिळाली. असं म्हणतात, की प्रेम कधी सुखासुखी मिळत नाही. हे खरं आहे. अपेक्षेप्रमाणे तुझ्या घरच्यांकडून विरोध होणार, हे मला माहीत होतं. पण प्रेम ठरवून तर होत नाही ना! शेवटी ते तुझे आईवडील. त्यांच्या भावना मी समजू शकते. पण मी? माझ्या भावना? त्यांचं काहीच मोल नाही? मी तुझ्यावर निस्वाथीर् प्रेम केलं. माझं आयुष्य तुझ्यापासून सुरू होतं आणि तुझ्यात संपतं. माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर. देव आपल्याला कधीच वेगळं नाही करणार. कारण या प्रेमाचा धागा त्यानेच बांधलाय. या चार वर्षांत मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही. आज एकच मागणं आहे. तू आपलं प्रेम घरच्यांसमोर उघड कर. प्रेमासाठी तू फक्त एक पाऊल उचल. तुझ्यासाठी मी सर्व आयुष्य देईन. तुझ्यासमोर येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुझ्याआधी समोरी जाईन. चार वर्षांपूवीर् मी पुढाकार घेतला होता. आज मी तुझी वाट बघतेय. तू कधी पुढाकार घेशील?

Tu asashil tuzya jagat....

तू असशील तुझ्या जगात सुखी
इथे तुझ्या नावाचे श्वास घेतो मी
ओंजळीत समेटून अश्रू सारे
तुलाच त्याचे अर्घ्य देतो मी

तुला कळेलच, उशिरा का होईना
माझं प्रेम नव्हतं इतकं व्यवहारी
दिल्या-घेतल्याचा हिशोब ठेवलास
पण तू राहशील प्रेमाशिवाय भिकारी

कधी कधी उगाच वाटतं मला
काय पाहिलं होतं मी तुझ्यात
तुझ्या-माझ्या नात्याचं भविष्य
तेव्हापासूनच होतं तळ्यात-मळ्यात

इतकं सारं सोसून, पाहूनही
मी माझ्या नशिबावर थक्क आहे
दारं उघडी ठेवलीत मी हृदयाची
पुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे

Prem katha

चेलेंज - Challenge ..हृदयस्पर्शी कथा :( Sad Heart touching marathi story Posted by sachin
एकदा एक मुलगा त्याच्या प्रेयसीला Challenge करतो कि,


"एक पूर्ण दिवस तू माझ्याशिवाय राहून दाखवायचे,
मला फोन, मैल, मेसेज काहीही करायचे नाही ............................
जर तू अस करून दाखविलेस तर मी तुझ्याशी लगेच लग्न करेन ........!!!"

मुलगी म्हणाली, "खरे तर मला एक क्षण सुद्धा तुझ्या शिवाय राहायचे नाहीये ........... पण तरीही आज तू मला challenge केले आहेस म्हणून मी एक पूर्ण दिवस काहीही contact न करण्याचे challenge स्वीकारत आहे !".

एक पूर्ण दिवस काहीही contact न करता जातो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी ती मुलगी खूप उत्सुकतेने त्या मुलाला भेटायला त्याच्या घरी जाते .................. पण ...............
घरात पोचताच ती तिच्या प्रियकराची पांढर्या शुभ्र कापडात ठेवलेली व वरती हार घातलेली body बघते

आणि तिला एकदम खूप मोठा धक्का बसतो .............
तिला हे अस कस झाले ??? , का झाले ????? .....काहीच कळत नव्हते..............
रडावे तर अश्रूंचा पूर येईल, शांत तर राहातच येत नव्हते ...... कंठ दाटून आलेला ......
सर्व आठवणी डोळ्यासमोर एक क्षणात उभ्या राहिल्या ........


तेव्हड्यात त्याच्या आईने त्याने तिच्यासाठी लिहिलेली चिठी तिच्याकडे दिली त्यात लिहिले होते ,

" कर्करोगाच्या आजरामुळे माझ्या कडे शेवटचा एकच दिवस राहिला होता म्हणून मला तुला challange करावे लागले ................आणि तू ते करून दाखविलेस, Baby...... , आता फक्त हेच तुला रोज करायचे आहे .......!!!"

Jevha kadhi prem karashil tevha............

जेव्हा कधी कोणावर प्रेम करशील तुला माझी आठवण होईल तुझ्याही डोळ्यांत तेव्हा माझ्यासोबतच्या क्षणांची साठवण होईल ...आठवणी जेव्हा माझ्या तुला एकांतात कवटाळतील तुझ्याही नजरा तेव्हा माझ्या शोधात सैरावैरा पळतील माझ्यासाठी रडणारे ते अश्रू तेव्हा तुझ्यावरच हसतील कारण तुझ्या गालांवर टिपणारे त्यांना ते ऒठ तेव्हा माझे नसतील...!!!

Bara zalaa tu gelas sodun maala.......

बर झाल तू गेलास सोडून मला ते आता नाही करत मी तुझा विचार आता नाही वाटत मला भीती , घरात असताना मोबाइल ची रिंग वाजली तर भीती दादा ने sms वाचायची, भीती आईने फ़ोन उचलायची आता गरज नाही वाटत मोबाइल सतत जवळ ठेवायची आता करते मी फ़क्त माझ्यचं मोबाइल चे recharge आता नसतात मोबाइल मधे misscall वर misscall बर झाल तू गेलास सोडून मला ते आता नाही करत मी तुझा विचार आता असते मात्रिणी सोबत , त्यांच्याशी गप्पा मारत , आता असतो मज्याकडे वेळ मंदिरात जायला आता मला मोजकेच पैसे न्यावे लागतात shopping ला जाताना बर झाल तू गेलास सोडून मला ते आता नाही करत मी तुझा विचार करते आहे मी माझ्या career चा विचार आता बांधली आहे मी माझ्या स्वप्नांची माडी स्वप्नांच्या माडीतले ते स्वनाचे घर , वाट पाहतेय त्या घरा ची जाईन मी , एका दिवशी , करेन लग्न ७ फेरे घेवून बनवेल मी २ कुणाची होईएल माझे आयुष्य सुखी बर झाल तू गेलास सोडून मला ते आता नाही करत मी तुझा विचार बर झाल तू गेलास सोडून मला ते आता नाही करत मी तुझा विचार असे कितीही म्हटले तरी शेवटी तुझ्यावरच कविता करते ..............

Tuzya dolyat......

तुझ्याच डोळ्यात पाहिलेला नि दोघांच्या मनांत वसवलेला स्वप्नांचा गाव मागतोय तुला. ऊगवतीचा सूर्य नाही, पण सांजेचा दिवा मालवून एकाकीपणांत तुझ्या स्वप्नांत रमवणारी निशा मागतोय तुला. परत तुझी साथ नाही पण, तू हात सोडल्यापासून माझी जगण्याची हरवलेली दिशा मागतोय ... विस्तृत तुझ्याच डोळ्यात पाहिलेला नि दोघांच्या मनांत वसवलेला स्वप्नांचा गाव मागतोय तुला. ऊगवतीचा सूर्य नाही, पण सांजेचा दिवा मालवून एकाकीपणांत तुझ्या स्वप्नांत रमवणारी निशा मागतोय तुला. परत तुझी साथ नाही पण, तू हात सोडल्यापासून माझी जगण्याची हरवलेली दिशा मागतोय तुला. तुझ्या काळजावरचा हक्क तर गमावला पण..... तुझ्या नजरेच्या एकाचं कटाक्षानं चुकलेला, माझ्या काळजाचा ठोका मागतोय तुला प्रितीचा वृक्ष उन्मळून पडण्याआधी, त्याला बांधून उंच अंबरी गेलेला स्वप्नांचा झोका मागतोय तुला. तुझ्या काळजाचा कोपरा नको, पण त्याच कोपऱ्यांत अडकलेला माझांच शेवटचा श्वास मागतोय तुला. तुला जाताना रोखणार नाही, पण तुझ्यासोबत निघून चाललेला माझा जगण्याचा ध्यास मागतोय तुला.... माझाच जगण्याचा ध्यास मागतोय तुला.

Mazya sathi evadha karashil ka????????????????

माझ्या साठी फ़क्त आता एवढच करशील का तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ? तुझ्या लग्ना मधे मी नक्की नक्की येइन शेवटच्या दिवशी तुला मी डोले भरून पहिन तो दिवस माझ्या साठी खुप दुखाचा असेल त्या दिवशी माझ्या कड़े पाहून हळूच हसशील का ? तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का? कदाचित तुझ लग्न मला नाही होणार सहन माझ्या डोळ्यात माझ च दिसल मला मरण मी मेल्यावर गुलाबाच फुल माझ्या फोटोला वाहशील का तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का

Nate premache.........

नाते प्रेमाचे या जगात नाही दुसरे प्रेमाहुन निर्मळ नाते... पण हेच नाते क्षणात आपुले जिवन विस्कटून जाते या नात्याला व्याख्या नाही थोर सांगून गेले बरे मात्र ते फार सुंदर असते! हे विधान आहे खरे. केव्हातरी मी हि केले होते, जिवापाड प्रेम एकावर....... पण, माझ्या प्रेमाला त्याचा नकार आहे आजवर. मला दु:ख नाही त्याच्या नकारार्थी उत्तराचे.. दु:ख वाटते ते त्याच्या प्रेमाच्या व्याख्येतल्या वासना आणि निव्वळ टाईमपास या शब्दांचे.... त्याला नाही कळला, माझ्या एकतर्फी प्रेमाचा अर्थ... त्याच्यासाठी वेचलेले प्रेमाचे अनमोल क्षण, ते सारे गेले व्यर्थ. मी त्याच्यावर आजही मनापासून प्रेम करते, मनातले प्रेमभाव, कवितेच्या रुपात वाहते. कळेल त्याला माझ्या एकतर्फी प्रेमाची व्यथा जेव्हा! फार वेळ झाली असेल... कारण, मी असेन देवाघरी तेव्हा!

Aathvan tuzi..........

तुझी आठवण आता येत नाही मला तुलाही मी आता आठवत नसेन तरीही पाऊस पडला की बाहेर बघ मी तुझीच वाट पाहत असेन पावसात तुला दिसणार नाहीत अश्रू अलगद जेव्हा मी तुझ्याजवळ बसेन आठवतील मग मला तुझे शब्द राग येऊन मग मी तुझ्यावर रुसेन आनंदात मग मी तू भेटल्यावर माझे डोळे हलकेच पुसेन तु विसरु शकणार नाहीस कलंडता सुर्य, लवंडती सांज पक्षांच्या माळा, किणकिणती सांज तु विसरु शकणार नाहीस सोनेरी उन, वा-याची धुन पावलांची चाहूल, ओळखीची खुण तु विसरु शकणार नाहीस दिलेला शब्द, ओझरता स्पर्श दडलेले प्रेम, ओसंडता हर्ष तु विसरु शकणार नाहीस भिजलेले डोळे, विरलेली स्वप्नं भिजलेली वाट, उरलेले प्रश्न तु विसरु शकणार नाहीस आणि मी ही विसरु शकणार नाही संध्याकाळ जवळ आली की............ संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं
पुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे तू असशील तुझ्या जगात सुखी इथे तुझ्या नावाचे श्वास घेतो मी ओंजळीत समेटून अश्रू सारे तुलाच त्याचे अर्घ्य देतो मी तुला कळेलच, उशिरा का होईना माझं प्रेम नव्हतं इतकं व्यवहारी दिल्या-घेतल्याचा हिशोब ठेवलास पण तू राहशील प्रेमाशिवाय भिकारी कधी कधी उगाच वाटतं मला काय पाहिलं होतं मी तुझ्यात तुझ्या-माझ्या नात्याचं भविष्य तेव्हापासूनच होतं तळ्यात-मळ्यात इतकं सारं सोसून, पाहूनही मी माझ्या नशिबावर थक्क आहे दारं उघडी ठेवलीत मी हृदयाची

Harapale sarva kahi........

मी स्वत:स हरपून जाते, हा भास तुझा होताना
नसलास जरी समोर तू,वाटते जणू असलेला

स्वप्नात माझ्या येउन हैराण मला का करतो
अन अवचित जाग ही येता, तू असाच भवती विरतो!

वेगाने वाहून वारा ,हे केस जेव्हा उडवतो
वाटते मनाला माझ्या, की तूच बटा खेळवतो..

झाडांची अलबेल शाखा ह पदर असा अडवते
ह्र्दय असे धड्धडते जणू तुझीच चाहुल घडते!

पावसांचे अलवार थेंब या ओठांवर ओघळती
वाटॆ तुझाच स्पर्श होई, पण तो ही भासच ठरतो!!

ताटकळत कैक वेळा , वाट तुझी मी बघते
पण तू न ये सामोरा , मन उगा हताश होते !

न कळे मजला क मी, उगाच तुझ्यावर रुसते
मग येता तू सामोरा, गालातच खुद्कन हसते!!

हा भास तुझा होताना……..

Prem mhanaje kay asata....................

प्रेम म्हणजे काय असतं ?………..
प्रेम म्हणजे असतो
एकच श्वास दोघांसाठी…..

प्रेम म्हणजे असतो
एकच विश्वास, कधीही न संपणारा…

प्रेम म्हणजे असते
एकच गाणे, दोघांनी गुणगुणायचे….

प्रेमात नसावी काही
मिळव्ण्याची भाषा……..

प्रेमात असावी एकच अभिलाषा……
न बोललेले शब्द ऎकायची…..

प्रेमात नसावे रुसवे फ़ूगवे
असावा फ़क्त आनंदी आनंद गडे……….
इकडे तिकडे चोहीकडे……..

एकदा तरी प्रेम जरुर करावे
पण ते आंधळे नसावे………..

कोणी तरी बोललेच आहे
“प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमचं same असतं”…………..

Asava kuni tari................

असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…..

असाव कुणीतरी…..
सकाळी साखरझोपेतुन उठवणारी,
आणी तो चेहरा बघुन माजी क्षणात झोप उडावी….
असाव कुणीतरी…..
प्रेमाने सकाळी चहा करून देणारी ,
आणी केविल्वान्य डोळ्यानी माज़कडे पाहत राहणारी…..

असाव कुणीतरी…..
मी जवळ नसताना माज्या सोबत घालवलेल्या,
प्रतेक क्षणाची आठवण काढत राहणारी…..

असाव कुणीतरी…..
माजा वेडेपना पाहून गालातल्या गालात हसणारं,
आणी शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारी…..

असाव कुणीतरी…..
भरलेच जर डोळे कधी माजे,
तर ओल्या असवांना पुसनारी…..

असाव कुणीतरी…..
माज्या मनात रमनारी,
अंधारलेल्या वाटेत माज्याबरोबर येणारी…..

असाव कुणीतरी…..
पलिकडील किना-यावरून माजी वाट पाहणारी,
उशीर जाला म्हणुन उदास आणी बेचैन होणारी ……

असाव कुणीतरी…..
असाव कुणीतरी…..तुज़्यामधे मी हरवले म्हननारी…

Manat tuuuuuu............

मनात तू,
हृदयात तू.
डोळ्यात माझ्या तूच तू
विचारात देखिल तूच!

जिथे जातो मी तिथे तू,
एखाद्या सावली सारखी माझ्या संगे असतेस तू!
पावलो पावली आठवतेस तू,
गल्ली बोळात देखिल दिसतेस तूच!

पहाटेच्या गारव्यात तू,
दुपारच्या कडक उन्हात देखिल तूच!
दिवसा स्वप्ने पाहतो मी त्यात देखिल तू,
रात्री झोप येत नाही ह्याचे कारण पण तूच!

डोंगर कपारीत फिरताना जाणवतेस तू,
राना वनात भासतेस तूच!
थकून थांबल्यावर पुढे जायला प्रोत्साहन देतेस तूच,
घामाच्या धारा पुसण्यासाठी बनलेला रुमाल देखिल तूच!

माझ्या रोमा रोमात तू
नसा नसात भिनलीस तूच!
श्वासात तू,
उसासे टाकतो मी, त्यात देखिल तू,
माझं सळसळणारं रक्त बनून धावतेस देखिल तूच!

माझ्या हळव्या मनाला छळणारी तू,
मनाला कधी सुखावणारी तू,
वाट पहायला लावून मन बेचैन करणारी तू,
त्याच मनाला कधी उभारी देणारी देखिल तूच!

अशी फ़क्त जाणवणारी ती तू,
कधीही न भेटणारी ती तू,
दूर राहुनाही सगळ्यात जवळ तू
जवळ असून ही सगळ्यात दूर तूच!

College madhali gammat..................

कॉलेजमध्ये असतानाkatie-melua-small
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली
आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास
मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?
तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.
मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..
ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…
अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास

Maitry sathi jaras..................

मैत्री म्हटली कीFrnds
आठवतं ते बालपण
आणि मैत्रीतुन मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण
कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यांत श्रेष्ठ
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्ट
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सुत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सुप्त भुक
मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्र मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजुन
चिंब-चिंब नाहली
मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देउन
गालातल्या गालात हसणारे…

Tu maj bhetaya yeshil ka??????????????????

अशाच एका सायंकाळी
तु मज भेटायासी येशील का?
आजही उभा त्या वाटेवरी
तु एकदा तरी जाशील का?

वाट पाहतो त्या नदीतीरी
वारा तु बनशील का?
वारा बनुनी हळूच येवूनी
प्रेमाचे चार बोल बोलशील का?

किनारा बनलो सागराचा
लाट तु होशील का?
काही क्षणांसाठी जरी असेल
तरी वाहत येवूनी मिळशील का?

आतुर झालो चातकापरी
तु वर्षा होशील का?
तुझ्या त्या एका थेम्बाने
मज मोहात टाकशील का?

तडफडतो, मरतो  मीनपरी
तु जीवन होशील का?
जीवनदान देवूनी माझ्या
जीवनात जीवन तु होशील का?

मृत्यू मार्गी उभा  ठाकतो  आहे ...
शेवटचे तरी येशील का?
माझ्या जळत्या त्या चितेसमोर
दोन आश्रू तरी ढाळशील  का?

सांग ना गं!एवढी तरी शेवटची इच्छा
माझी तु पुरी करशील का?

Premat tuzya.............

प्रेमात तुझ्या पाहिलेली स्वप्ने
तुझ्या नकाराच्या वादळात सापडली
एकवटून ठेवलेली ती हृदयात
कुठे चोहीकडे विखुरली

अनमोल माझी ती स्वप्ने अशी
का मातीमोल जाहली
रात्ररात्र जागून पाहिलेली ती स्वप्ने
क्षणार्धातच झोपली

स्वप्ने पाहताना एक क्षण हि
वाट नाही पहिली
असे अघटीत घडेल अशी कल्पना हि
मनाला नाही वाटली

विखुरलेली ती स्वप्ने आश्रू
पुसून उचलली
मात्र तुच इथे नसल्यावर
ती अर्थहीन जाहली

तुझ्या प्रेमात पाहिलेली स्वप्ने
स्वप्नेच राहिली
ती हि मला तुझ्यासारखे
परके
करून गेली.